
वाशीम,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) वाशिम प्रतिनिधी,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा वाशिम यांनी घेतली अर्पित चव्हाण साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम व माननीय ससाने साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम व उपशिक्षणाधिकारी माननीय डाबेराव साहेब प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांची भेट.
*शिक्षकांचे व शाळांचे प्रलंबित प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा..*
१ सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विज्ञानाची रिक्त पदे भरण्यात यावी. उर्दू माध्यमाच्या शाळेतील कमी असलेल्या पाठ्यपुस्तक विद्यार्थी पटा प्रमाणे उपलब्ध करून द्यावे. शिक्षकांना मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परवानगी द्यावी. जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत सर्व पंचायत समितीमध्ये सेवा पुस्तक अध्यापक होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे. जिल्हा परिषद शाळांना किरकोळ दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावी.. दि.०२/०२/२०२४ चा शासन निर्णय प्रमाणे जाहिरात अधिसूचनानुसार आंतर जिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या संबंधित जिल्हा परिषदांना पत्र आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावे.. शासन निर्णय प्रमाणे एन. पी. एस. धारक शिक्षकांना २५% टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे जर एनपीएस धारक शिक्षक त्याच्या खात्यातील 25% रक्कम काढायची असेल तर त्यासाठी आपल्या जिल्हा परिषद कडून कागदपत्राची यादी किंवा प्रस्ताव प्रसिद्ध करून योग्य ते मार्गदर्शन व्हावे.वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती मधून शिक्षकांचे वैद्यकीय देयके प्रस्ताव विना विलंब सादर करण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचना द्यावे.
सर्व विषयावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद वाशिम समोर चर्चा करण्यात आली . सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली.तसेच माननीय उपशिक्षणाधिकारी डाबेराव साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील सर्व विषय मार्गी लावतो असा आश्वासन उपशिक्षणाधिकारी माननीय डाबेराव साहेब यांनी दिले.सोबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हसीन देशमुख जिल्हा सचिव कलीम खान जिल्हा नेते जाकीर शाह लतिफ शाह जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद रिजवान आदि उपस्थित होते.
