
बुलढाणा 🙁न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला बुलढाणा नगरपालिका मधील मागासवर्गीय बौद्ध सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा देण्यात यावी या मागणी करता आज दि 15 जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये बुलढाणा नगरपरिषद चे वाल्मिकी मेहतर सफाई कामगारांना न. प कार्यालयाच्या मागील बाजूस राहण्यासाठी जागा दिली आहे तसेच मुस्लिम मेहतर सफाई कामगारांना हिंदू स्मशानभूमी जवळ बांधण्यात आलेले घरकुल योजनेतील इमारतीमध्ये घर देण्यात आले आहे त्याचप्रमाणे उर्वरित बौद्ध व नवबौद्ध समाज सफाई कामगारांना यांची सेवा पंचवीस वर्षे झाली असूनही आतापर्यंत त्यांना कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट केले नाही व लाभापासून वंचित ठेवत आहे तरी आजही त्यांच्यावर अन्याय होत आहे. या अगोदर सुद्धा वारंवार तक्रारी करण्यात आली आहे मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात निवासी प्रयोजन साठी खाली भूखंड उपलब्ध करून न मिळाल्यास आम्ही बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालया समक्ष 13 ऑगस्ट 2025 पासून काम बंद उपोषण सुरू करणार आहे त्याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनाचे जिल्हाध्यक्ष विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
