
खामगाव,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह):-
खामगाव अकोला रोडवरील टेंभुर्णा शिवारात हॉटेल शिवप्रसाद समोर आज ३ सप्टेंबर २५ रोजी पहाटे ५.५० वाजताच्या सुमारास नादुरूस्त ट्रक क्र. एनएल०१-एडी-६१६७ रस्त्याच्या खाली उभा असतांना अकोल्याकडे जाणान्या ट्रेलर क्र. आरजे-४२-जीए-३३३६ च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून ट्रकला मागून धडक दिली. धडकेत ट्रेलर चालक मुस्ताक खान तयबखान (वय ३०, रा. खेकडा, ता.जि. अलवर, राजस्थान) व क्लिनर, शाकीरखान सुभान (वय ३४, रा.सेमला खुर्द, ता. गोविंदगढ़, जि. अलवर, राजस्थान) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रक व ट्रेलरचे नुकसान झाले. या प्रकरणी ट्रक चालक शमशेर अलम मोबिन मियाँ यांनी ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये मृतक ट्रेलर चालकाविरुध्द कलम २८१, १०६ (५), ३२४ (४), (५) भान्यासं नुसार गुन्हा दाखल केला आहे.
