
साखळी • न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बु. मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. आर. सय्यद भाऊसाहेब हे होते तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

याप्रसंगी कु. पुनम जुमडे, कु. लक्ष्मी विरशिद, कु. वेदिका लवंगे, कु. आराध्या सपकाळ, कु. रोहीणी चौधरी, कु. लक्ष्मी विरशिद या विद्यार्थिनींनी प्रेरणादायी भिमगीत सादर करुन समतेचा संदेश दिला.तर कु सोनाक्षी बुंधे, कु. वेदिका लवंगे, कु. रोहीणी चौधरी, कु. लक्ष्मी विरशिद यां विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
संस्थेचे शिक्षक डॉ शिवाजी देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिसुत्री ‘स्वातंत्र्य-समता-बंधुता’ यांचे महत्त्व विशद करून भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित करण्यासाठी योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षिय भाषणातून प्राचार्य आर आर सय्यद भाऊसाहेब यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त भाषणात बद्दल गौरवोद्गार काढले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाने नियमित वाचन आणि अध्ययन केले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण प्रत्यक्ष जीवनात उतरविण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. खूशी गायकवाड व कु. तनूजा चाटे यांनी केले तर आभार कु. रुतुजा जुमडे या विद्यार्थिनींनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या विचारावर वाटचाल करण्याचे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
