

बुलडाणा •न्युज महाराष्ट्र लाईव्ह (प्रतिनीधी)
घरगुती गॅसच्या व्यवसायिक वापर केल्यास होणार कडक कारवाई असा इशारा पुरवठा अधिकारी नीलिमा उरकुडे यांनी दिला आहे.
सध्या जागतिक पातळीवर खाडी देशामध्ये सुरू असलेल्या परिस्थितीमुळे भविष्यात अत्यावश्यक वस्तूच्या तुतोडा निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही.
या परिस्थितीमुळे काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेत केंद्र सरकारने जीवन आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ अंतर्गत तसेच मेंटेनेंस ऑफ़ प्रोडक्शन स्टोरेज एंड सप्लाई (maintenance of production storage and supply) अंतर्गत दिनांक ९ मार्च २०२६ पत्रानुसार आवश्यक ती कारवाई च्या निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप धारक तसेच हॉटेल उपहारगृह व धाबा मालक आणि मंगल कार्यालय मालक यांनी घरगुती गॅस व्यवसायिक वापर करू नये असे निर्देश प्रशासनाकडून दिले आहे, संबंधित ठिकाणी घरगुती गॅस च्या वापर करतांना आढळल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा बुलढाणा निरीक्षण अधिकारी नीलिमा उरकुडे यांनी दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर दक्षता पथक तय्यार करण्यात आले आहे बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांचे अध्यक्षतेखाली या पथकाद्वारे गॅस एजन्सी पेट्रोल पंपाची तपासणी केली जाणार आहे तपासणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमिता किंवा बेकायदेशीरपणे गॅसचा काळाबाजार करताना आढळल्यास जीवन आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
