

लोणार•न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
शहरातील जम जम कॉलनीसह परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात जमीयत उलेमा हिंद शाखा लोणारचे अध्यक्ष मोहम्मद रिजवान मोहम्मद नासेर जड़ा यांनी नगरपरिषद वा तसेच तहसीलदार साहब लोणार कडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.

तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे, जम जम कॉलनी तसेच शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे नागरिक तसेच वृद्ध व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज घडलेल्या एका घटनेत त्यांची स्वत लहान मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून तिला जखमी केले. जखमी मुलीवर उपचार सुरू असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता तातडीने कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडणे, निर्बंधात्मक उपाययोजना करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी संबंधित विभागाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा, तहसीलदार लोणार तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन लोणार यांनाही पाठविण्यात आली आहे.
