

बुलढाणा•न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत बुलढाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी पोलिसांच्या संयुक्त पथकासह विशेष तपासणी मोहीम राबविली. शहरातील विविध हॉटेल्स व खाद्य व्यवसायिकावर अचानक छापे टाकत अवैध वापर वर जोरदार कारवाई केली या कारवाईत शहरातील हॉटेल्स, उपहारगृहे आणि हातगाड्यांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ३९ ठिकाणी तपासणी करण्यात आली असता ११ ठिकाणी १४ घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. संबंधित सिलिंडर पथकाने ताब्यात घेतले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अचानक छापे टाकून अनधिकृतरीत्या वापरले जाणारे सिलिंडर जप्त केले. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या या धडक धडक कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
