
बुलढाणा,( न्युज महाराष्ट्र लाईव्ह):
काळविटाची शिकार करून मास विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वन विभागाला मिळताच त्यांनी शेलगाव आठोड ते आनचारवाडी शिवारात धाव घेतली यावेळी रस्त्यावरील एका शेतात काळविटाची मास विक्री सुरू असल्याचे निदर्शनात आले. वन विभागाचे कर्मचाऱ्यांना पाहतात शिकारी शेजारील मक्का पिकात फरार झाले.
ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. घटनास्थळावरून एक कापलेला व एक जिवंत काळवीट तसेच एक मोटरसायकल व चार चामडे व इतर शिकारी साहित्य जप्त करण्यात आले आहे
बुलढाणा वन परिक्षेत्रातील शेलगाव आठोड तेव आनचारवाडी जवळ एका शेताला लागून काळविटाची शिकार करून मास विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वन विभागाला मिळतास बुलढाणा (डी एफ ओ) सर्वोच गवस (ए सी एफ) वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा (आर एफ ओ) सुनील वाकोडे यांनी वनपाल मोहसीन खान वनरक्षक गजानन पोटे समाधान लोटे वन मजूर प्रवीण सोनवणे, पवन मुळे यांना रवाना केले घटनास्थळी काहीजण काळविटाची शिकार करून मास विक्री करीत असल्याचे दिसून आले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहता शिकारी घटनास्थळी वरून बाजूच्या मका पिकात फरार झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले.
अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वन जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून घटनेच्या तपास सुरू असल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी २४ ऑगस्टला रात्री ९ वाजेच्या सुमारास दिली आहे.
