
बुलढाणा,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह):-
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर येथे सासरच्या त्रासाला कंटाळून एका 42 वर्षीय विवाहितेने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी वैरागड येथे घडल्याची माहिती आहे.वैरागड येथील मीरा भास्कर घोगरे (वय वर्ष 42) या महिलेने 20 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेत आपली आयुष्य संपवलं आहे. याबाबत मृतक महिलेचा भाऊ यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देत दिली आहे. बहीण मीरा हिला तिचा पती भास्कर घोगरे, सासू गुंफाबाई दिगंबर घोगरे व दीर राजू भास्कर घोगरे यांनी घरगुती कारणावरून, वडिलांचे प्लॉट का मागत नाही,
या कारणावरून बहिणीला वारंवार मारहाण करून तिचाशारीरिक व मानसिक छळ केला, तिला जीव देण्यास प्रवृत्त केले, अशी फिर्याद मृत महिलेचा भाऊ विठ्ठल सखाराम आडळकर (वय वर्ष 50, राहणार तळणी तालुका मंठा) यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरुन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी पती भास्कर दिगंबर घोगरे (वर्ष 50), सासू गुंफाबाई दिगंबर घोगरे (वय वर्ष 75) आणि दीर राजू भास्कर घोगरे (वय वर्ष 26) यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 278/20 25 कलम 108,3585 बी एन एस नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अमडापूर पोलिस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ करीत आहेत.
