
लोणार (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,
गुरांना होणाऱ्या लंपीच्या आजाराच्या पारश्वभूमीवर येत्या शुक्रवारी साजरा होणाऱ्या बैल पोळ्याला प्रत्येक गावाच्या मारोती मंदिर किंवा वेशी वर त्या त्या गावातील बैल एकत्रित आणून पोळा भरविण्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानव्ये या वर्षी निर्बंध आणले गेले आहेत त्यामुळे जिल्हातील तमाम बळीराजाच्या आनंदावर विरजन पडले आहे, हे निर्बन्ध त्वरित रद्द करून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला प्रतिबंधक लस दिली आहे त्या शेतकऱ्यांना बैल पोळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ भास्कर मापारी मा. अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बुलडाणा यांनी लोणार तहसीलदार यांच्या मार्फत बुलडाणा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे,
या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, बैल पोळा हा सण जवळपास सर्व धर्मातील शेतकरी अतिशय उत्साहने दरवर्षी साजरा करतात, परंतु गेल्या दोन तिन वर्षा पासून नेहमी बैल पोळा सनावर लंपी या पशु आजाराचे कारण दाखवून निर्बंध घातले जातात,महाराष्ट्रातील कृषी संस्कृती मध्ये बैल पोळा अतिशय महत्वाचा सण आहे, नव्या पिढीला या सणाचे महत्व कळण्यासाठी तसेच वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याची परंपरा जोपसण्यासाठी हा सण साजरा करने आवश्यक आहे,केवळ बैल पोळा भरवला म्हणून लंपी आजाराची साथ वाढेल हा तर्क पटण्यासारखा नाही कारण आपल्या जिल्यातील बहुतांश गावात आजही संपूर्ण गावातील गुरे एकत्रित पणे गावाबाहेरील कुरणा मध्ये चरण्यासाठी नेण्याची पद्धत आहे त्याला ग्रामीण भाषेत ‘गवारे ‘ असे संबोधित केले जाते, त्यामुळे केवळ पोळा सणालाच नव्हे तर इतर दिवशी सुद्धा गु्रांचे एकत्रितकरण केले जाते त्यामुळे केवळ बैल पोळ्याच्या एका तासापूर्त्या बैलांच्या एकत्रित येण्यामुळे हा आजार अजून वाढेल हा तर्क योग्य वाटत नाही,
त्यामुळे हा आजार नियंत्रण करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना प्रतिबंक लस दिली आहे किमान त्या बैलांचा पोळा भरविण्यास परवानगी देऊन कृषी संस्कृती महत्वपूर्ण सण असलेल्या बैल पोळा सण बळीराजाला आनंदात आणि उत्सहात साजरा करू द्यावा ही आग्रही मागणी डॉ.भास्कर मापारी यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पाठवलेल्या निवेदनात केली. मा जिल्हाधिकारी या निवेदनाचा साकल्याने विचार करून आपले आदेश मागे घेतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
