ज्येष्ठ पत्रकार कायस्थ यांची महसूल मंत्री यांना तक्रार !

बुलढाणा ( न्यूज महाराष्ट्र लाईव्ह )प्रतिनिधी:-
मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी सातगाव म्हसला येथे कार्यरत असताना, तुकडेबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर अनोंदणीकृत वाटणीपत्राचे ५० फेराफार मंजूर केल्याने विजय दत्तात्रय टेकाळे यांना कायद्यानुसार बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार तथा ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र कायस्थ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
तक्रारदार कायस्थ यांच्याकडे अनेक पुरावे आहेत. परंतु जिल्हाधिकारी यांना ७ वेळा तक्रारी करून देखील संबंधित यंत्रणा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला का वाचवत आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या हिवरा आश्रम मेहकर येथे कार्यरत असलेल्या विजय टेकाळे यांनी म्हसला बु. येथे कार्यरत असताना, चांडोळ भाग एक व दोन येथील तलाठ्याकडून तुकडेबंदीचे उल्लंघन करीत नियम धाब्यावर ठेवले व अनोंदणीकृत ५० फेरफार मंजूर केले. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला. शासनाचा गलेलठ्ठ पगार मिळूनही भ्रष्टाचार करणाऱ्या या महाभ्रष्टाचारी विजय दत्तात्रय टेकाळे नावाच्या अधिकाऱ्यांवर २ वर्षांपूर्वीच कारवाईची मागणी केली होती.
परंतु महसूल मधील काही चलाख अधिकारी शासनाच्या जाळ्यात कसे काय सापडत नाही? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने, अधिकाऱ्यांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सुद्धा या तक्रारीच्या अनुषंगाने साधी चौकशी सुद्धा केली नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा यंत्रणेला पुरावे देऊनही कायद्याला पळवाटा असल्यामुळे पत्रव्यवहार करण्यातच वेळ मारून नेत आहेत, असे तक्रारकर्ते जितेंद्र कायस्थ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तक्रारकत्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक भ्रष्टाचाराचे पुरावे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, आयुक्त अमरावती, अमरावती, एसीबी बुलडाणा जिल्हाधिकारी, एसीबी बुलडाणा या सर्वांना पूर्ण पुरावे दिले आहेत परंतू जिल्हाधिकाऱ्यांकडून एसीबी कडून किंवा महसूल विभागाकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश अद्याप पर्यंत देण्यात आले नाही किंवा तक्रारकर्त्याला कोणतेही पत्र व्यवहार नाही, टेकाळे नियमबाह्य केलेल्या कामातून करोडो रुपयांची चल अचल संपत्ती स्ततः हा व परिवारातील सदस्या नावे असून त्यांचे शेकडो सातबारे हे नावाचे प्रशासनाकडे दिले आहेत. तरी या भ्रष्टाचार संदर्भातील अहवाल अद्याप पर्यंत का दिले नसल्याची चौकशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी त्वरित घ्यावी व संबंधित विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात येण्याची मागणी तक्रारदार कायस्थ यांनी महसूलमंत्र्यांना कारवाई न झाल्यामुळे निवेदनाद्वारे केली आहे.
