
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या (India vs England) अखेरच्या दिवशी आता सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कहर केला अन् इंग्लंडला फक्त 192 धावांवर रोखलं. यामध्ये मोहम्मद सिराजचा मोठा वाटा होता. सिराजने एका एन्डने आग ओकणारी बॉलिंग केली आणि डकेट आणि ओली पोप या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना माघारी पाठवलं. मात्र, यावेळी सिराजने एक चूक केली. त्याचा शिक्षा त्याला आयसीसीने (ICC Punished Mohammad Siraj) दिली आहे.
