
पुसद (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह)
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन युनिट पुसद च्या वतीने आज दिनांक २७/७/२०२५ रोजी हाजी अख्तर खान न.प. उर्दू हायस्कूल येथे “कृत्रिम बुद्धिमत्ता – शिक्षणाचे भविष्य” या विषयावर एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरानाच्या पठणाने करण्यात आली
मुख्य पाहुण्यांचे पारंपरिक पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद अतीक शेख यांची अध्यक्षता लाभली. मुख्य वक्ते म्हणून शेख शफी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिटरगाव ढाणकी, शिक्षण विस्तार अधिकारी बोजेवार साहेब, मोहम्मद जियाउद्दीन मुख्याध्यापक हाजी अख्तर खान नगर परिषद उर्दू हायस्कूल पुसद, मोहम्मद सादिक मुख्याध्यापक गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स पुसद, सलीम खान शकूर खान यवतमाळ जिल्हा अध्यक्ष उर्दू टीचर्स असोसिएशन, आयटा जिल्हाध्यक्ष अब्दुल समद, जिल्हा सचिव समीर अहमद, जिल्हा उपाध्यक्ष साजिद मिर्झा, युनिट अध्यक्ष नासिर खान व युनिट सचिव मोहसिन अहेमद या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत पुसद तालुक्यासह उमरखेड, दिग्रस, आर्णी, वाशिम ,माहूर व महागाव परिसरातील विविध शाळांमधील सुमारे २०० शिक्षक-शिक्षिकांनी सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे नक्की काय, ती शैक्षणिक प्रक्रियेत कशा प्रकारे उपयोगी पडू शकते, Gemini, ChatGPT, Google tools, Canva सारख्या साधनांचा शिक्षणात उपयोग, AI मुळे शिक्षकांच्या भूमिकेत होणारे बदल, भविष्यातील आव्हाने यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
मोहम्मद अतीक शेख प्रदेश अध्यक्ष आयटा महाराष्ट्र यांनी आपले अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “आजच्या डिजिटल युगात शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी समरस होणे गरजेचे आहे. AI हे भविष्य आहे, त्याचा सकारात्मक वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवू शकतो.”
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक शफी शेख सरांनी प्रात्यक्षिक सादर केले ज्यामध्ये शिक्षकांना AI च्या विविध साधनांचा वास्तविक वापर करून दाखवण्यात आला. यावेळी सहभागी शिक्षकांनी AI संबंधित विविध प्रश्न विचारून तज्ञांकडून माहिती घेतली.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन नासीर खान यांनी केले तर प्रास्ताविक अब्दुल समद जिल्हा अध्यक्ष व संघटनेचा परिचय मोहसीन अहमद युनिट सचिवांनी दिले शेवटी आयटा जिल्हा उपाध्यक्ष साजिद मिर्झा यांनी सर्व सहभागींचे, पाहुण्यांचे आणि आयोजक समितीचे आभार मानले.
या कार्यशाळे मुळे शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ते संबंधित नवीन ज्ञान प्राप्त झाल्याचे सहभागी शिक्षकांनी सांगितले. आयटा युनिट ने भविष्यातही अश्या उपयुक्त कार्यशाळा आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
