
लोणार(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह)शहराबाहेरील घरकुल परिसरात लोणार पोलीस स्टेशनचे बिट जमादार संतोष चव्हाण व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे पेट्रोलिंग साठी घरकुल परिसरात गेले होते त्या ठिकाणा वरून पेट्रोलिंग करून परत येत असतांना त्यांना त्या ठिकाणी एका डोहात जवळ मुलगा ओरडत उभा होता त्यांची नजर डोहा जवळ गेली तर एक चिमुकला पाण्यात बुडताना दिसून आला क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले व त्यांचा कुटुंबियांच्या स्वाधीन केले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले त्यांच्या या कामगिरी मुळे सर्वत्र पोलीस कर्मचारी यांचेवर कोतुकाचा वर्षाव होत आहे.
या वरून असे समजते देव तारी त्याला कोण मारी!
खरच पोलीस बिट जमादार संतोष चव्हाण व अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे त्या मुलाच्या साठी देवदूत ठरले हे मात्र खरे
त्यांच्या या कामाची दखल नवनियुक्त पोलीस अधिकारी यांनी घेऊन त्यांचा गौरव करावा हीच उल्कानगर वासीयांची इच्छा
घरकुल परिसरातील हा पाण्याच्या डोह खूप धोकादायक आहे भविष्यात अशी घटना परत घडू नये या साठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी घरकुल वासी करीत आहेत या डोहात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्या मुळे त्या परिसरातील नागरिकांनी सतर्कता ठेवावी व आपल्या चिमूकल्याकडे लक्ष ठेवावे :- पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे
