
जामनेर (न्युज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या 21 वर्षीय सुलेमान रहिमखान पठाण याच्या मॉब लिंचिंगच्या घटनेच्या निषेधार्थ अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे जाऊन मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी स्थानिक ठाणेदार आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली.
घटना घडली त्यावेळी ठाणेदाराचा मोबाईल बंद होता, एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांना सुगावा लागत नव्हता .मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत. मृत सुलेमान पठाण हा गणपती मंडळाचा अध्यक्ष असून समाजात सक्रिय भूमिका बजावत होता. असे असतानाही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.असा आरोप आमदार पठाण यांनी केला
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषारोपपत्र योग्य पद्धतीने दाखल न झाल्यास आगामी अधिवेशनात हा प्रश्न संपूर्ण काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील सर्व घटकांकडून जोरदारपणे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आमदार पठाण यांनी दिला. सध्या पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून आतापर्यंत आठ आरोपींच्या अटकेची पुष्टी केली आहे. मात्र मुख्य आरोपीची अटक प्रलंबित आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण आणि आपला पक्ष संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस नेते रईस जमादार, अधिवक्ता जावेद कुरेशी, शेख रियाज, शेख नजम, शेख शोएब, मुसा पिंजारी अल्पसंख्याक शहराध्यक्ष, रफिक मौलाना, अशफाक पटेल, शेख मुख्तार परवेज मुल्लाजी जामनेर तसेच अधिवक्ता रईस जमादार, जावेद कुरेशी माळी नगरसेवक मलकापूर आदी उपस्थित होते.
