
न्युज महाराष्ट्र लाईव्ह- यासीन शेख
लोणार : येथील बसस्थानकावर प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून अटक केली. तिच्याकडून चोरलेला मोबाईल, चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी दिनकर भगवान गुंड (रा. शिरपूर, ता. मंठा, जि. जालना) यांनी लोणार पोलिसांत तक्रार दिली. दिनकर गुंड हे दि. १० सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून बसने लोणार येथे आले होते. दुपारी १२ वाजता बसमधून उतरत असताना गर्दीत त्यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने पोलिस पथक रवाना झाले. पथकातील नाईक संजय जाधव, पोलिस संतोष चव्हाण, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर निकस, गजानन डोईफोडे, शिला डाखोरे यांनी परिसरात शोधमोहीम राबवली.
तपासा दरम्यान ज्ञानेश्वरी नितीन पवार उर्फ ज्ञानेश्वरी विकास काळे (२६, रा. अंढेरा, ता. देऊळगावराजा) ही महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळली.
उत्तरे चौकशीत देत उडवाउडवीची असल्याने तिला ताब्यात घेऊन पर्सची झडती घेतली असता प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, चोरीसाठी वापरण्यात येणारे चार ब्लेडचे तुकडे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.
सदरची कारवाई हि मा. पोलिस अधिक्षक बुलडाणा, निलेश तांबे, अपर पोलिस अधिक्षक बुलडाणा,अमोल गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी, मेहकर प्रदिप पाटील यांचे मार्गदर्शनात पो.नि.निमिष मेहेत्रे, यांचे, टाऊन बिट अंमलदार नापोकों संजय जाधव, पोहेकों संतोष चव्हाण, जानिल शिंदे, ज्ञानेश्वर निकस, गजानन डोईफोडे, व शिला डाखोरे यांनी केली आहे.
