
लोणार, न्युज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख:
दिनांक 11/9/2025 रोजी 11 वाजता लोणार तहसील कार्यालयावर धडकला सकल बंजारा समाजाचा मोर्चा लोणार तालुक्यातील सर्व बंजारा समाज शहरातील तांडा येथे एकत्र येऊन सकल बंजारा समाज बांधवांनी शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालय येथे पोहचला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदना नुसार हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे बऱ्याच राज्यात बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे त्यानुसार सकल बंजारा समाजाला समाविष्ट करण्यात यावे जर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करून न घेतल्यास हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने समाज बांधवांचा न्यायासाठी हा मोर्चा मुंबई येथे धडकेल मुंबई जाम करेल त्यासाठी शासनाने तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला हैद्राबाद गॅझेट नुसार आरक्षण द्यावे अशी मागणी केली.
ज्या राज्यात बंजारा समाजाला एसटी चे आरक्षण आहे त्याच आधारे आम्हाला सुद्धा आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली.व जिंतूर येथील बंजारा संघर्ष योद्धा विनोद आडे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा सुद्धा समाज बांधवांनी दर्शविला यावेळी सकल बंजारा समाज हजारोची संख्येने उपस्थित होता.
