
बुलडाणा,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह):
अपघात.. गाडी चालकाच्या गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी टर्नमध्ये जागीच पलटी झाल्याची घटना आज दिनांक ९/९/२०२५ रोजी ११.३० ला मतिमंद शाळा समोर धाड नाक्याजवळ बुलढाणा येथे घडली.
महिंद्रा बोलेरो पिकप चालक आकाश गुप्ता इंदौर येथून मुंबईकडे जात होता बुलढाणा पोहोचल्यावर टी बी दवाखान्याजवळ त्याला एक थार गाडीने मागेपुढे करून त्याला कट मारून भरधाव पडून गेला त्यावेळी महिंद्रा बोलेरो पिकप एम पी ०९ सी एच ९१५६ चालक आकाश गुप्ता वय ३१ राहणार इंदौर यांच्या गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी भीषण पलटी झाल्याची घटना घडली दुर्दैवाने कोणाला जीवाची हानी झाली नाही
बुलढाणा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या गाडी चालकांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
