
लोणार,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख)
लोणार : तालुक्यातील मौजे सुलतानपूर येथील गट नंबर ८८५ मधील शेतकरी बांधवांचे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून अतिक्रमण आहे तसे पुरावे सुद्धा आहेत. त्यामध्ये १९९० च्या अगोदरच्या दंडाच्या पावत्या व शासनाकडे वेळोवेळी केलेला. पाठपुरावा भाडेपट्टा मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.परंतु शासनाने नेमलेल्या महसूल प्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्याला आज शेतीच्या सातबारा पासून वंचित राहावे लागले आहे. याच गटामध्ये ५० ते ६० वर्षापासून वहीती करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये शासनाने योग व आयुर्वेद हॉस्पिटल आणण्याचा घाट घातला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे प्रमाणे जपलेल्या व माळरान खडकाळ जमीन मुलाप्रमाणे सांभाळून, त्याच भरोशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु स्थानिक महसूल कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांनी सुपीक व वहिती असलेली जमिन पडीत असल्याचा शासनाला आव्हाल दिला.या चुकीचा अहवाल दिल्यामुळे शासनाने या ठिकाणी योग व आयुर्वेद हॉस्पिटल करण्याचे प्रस्तावित केले. त्यामुळे चुकीचा अहवाल देणाऱ्या कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फाची कारवाई करण्यात यावी व शासनाच्या नियमानुसार सन १९९० च्या अगोदर असलेल्या दंडाच्या पावत्या ग्राह्य धरून, नियमाकुल करून, भाडेपट्टे देऊन, सातबाराला फेर घेऊन नोंद करण्यात यावी. या आदी मागण्या घेऊन, नागवंशी सामाजिक संघटनचे सर्वेसर्वा नागवंशी संघपाल पनाड, आम्रपाल भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात उपोषणकर्ते यांनी मौजे सुलतानपूर येथील गट क्रमांक ८८५ मधील शेतीच्या बांधावर प्राणांतिक आमरण उपोषणाला आज दि.८/९/२०२५ रोज सोमवार पासून बबन ग्याणू पनाड, हसन खा. महेताब खा. पठाण, रामेश्वर राजहंस जावळे,शुभम संजय पनाड यांनी सुरूवात केली.
