
धाड ,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी),
बुलढाणा तालुक्यातील धाड मध्ये दारूची अवैध विक्री जोमात सुरू आहे.अशात गणेश विसर्जनाच्या दिवशी 6 सप्टेंबरला “ड्राय-डे” घोषित करण्यात आलेला असताना देखील धाड मध्ये अवैध दारूची विक्री सुरू असल्याची बाब आज एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे.याकडे दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
बुलढाणा तालुक्यातील धाड हे मुख्य बाजार पेठ आहे.खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज धाड येथे येतात. अशात करडी रोड वरील विद्युत कार्यालय जवळच एका व्यक्तीने दारूची अवैध विक्रीचा व्यवसाय सुरू केला.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने या अवैध दारू विक्रेत्याची हिम्मत वाढली आहे म्हणूनच तो “ड्राय डे” च्या दिवशी देखील सर्रासपणे दारूची अवैधपणे विक्री करत असल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.नेमकं व्हिडिओ कधीचा आहे है स्पष्ट नसले तरी तो ड्राय डेच्या दिवशी समोर आला आहे. दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.धाड हे प्रशासनाच्या नजरेत अतिसंवेदनशील गांव असून सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दारूची अवैध विक्री करणाऱ्यामुळे प्रशासनाचा तान वाढू शकते,या कडे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
