
बुलडाणा,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह):-
“मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी ” या घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवस जिल्ह्यात चांगलाच गाजला.
दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी चिखली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिसानिमित्त “मी चाललो वोट चोरी रोखण्यासाठी” या जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. परंतु या शांततामय व संविधानिक कार्यक्रमात अडथळा आणत चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे अन्य 13 काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा प्रकार प्रशासनाकडून लोकशाहीवरील सरळसरळ आघात असून, काँग्रेस पक्षाने याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. यावेळी कार्यरत ठाणेदार चिखली यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, ही ठाम मागणी देखील करण्यात आली आहे.
हे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दिले.
