
बुलढाणा, (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) :
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे प्र. निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.
