बंद पथदिवे सुरू करण्यासाठी सरसावली भाजपा..!

लोणार,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,यासीन शेख
पर्यटन नगरी असलेल्या लोणार शहराची जगभरात एक वेगळी ओळख आहे एतिहासिक तथा भौगोलिक महत्व असलेल्या शहरात पर्यटकाची नेहमी वर्दळ असते या शहराला आजरोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कामचुकार धोरणामुळे शहराचा नावलौकीक मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे.
शहरात रोज नवीन नवीन समस्या डोक वर काढत आहे काही दिवसाआधी आमदार सिद्धार्थ खरात यांनी शहराची भकास अवस्था बघून मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना झापले असता मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी खांदेपालट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तरी शहराची अवस्था अजून भकास होत गेली यामुळे भाजपा ने शहर स्वेच्छतेसाठी निवेदन दिले भाजपाच्या निवेदना नंतर परत एकदा खांदेपालट करण्यात आले.ही समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत पाणी पुरवठा चे बोरखेडी धरणाचे महावितरण ने विद्युत पुरवठा खंडीत केला सोबतच शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असून शहराचे विस्तारीकरण झालेले असून सुद्धा अनेक प्रभागात आजपर्यंत पथदिवेची सोय करण्यात आलेली नाही. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन रस्ता शोधावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी कित्येकदा साप,विंचू निघत आहे.लाईट बंद असल्यामुळे शहरात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील यामुळे आज दिनांक 28.08.25ला भाजपा कडून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की येणाऱ्या 15 दिवसात शहरातील बंद पथदिवे पूर्ववत सुरू करावे व विस्तारिकरण झालेल्या अनेक प्रभागात नविन पथदिवे बसवावे अन्यथा भाजपा कडून नगरपालिकेला टाळा ठोकू नगर पालिका कार्यालयातच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल
असा इशारा ही देण्यात आला आहे..यावेळी भाजपा प्रभारी तालुका अध्यक्ष गजानन मापारी, शहर अध्यक्ष शुभम बनमेरू,शुभम देसाई, निखिल मुलंगेसह भाजप पदाधिकारी हजर होते.
