
लोणार,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,यासीन शेख
लोणार एआयएमआयएम पक्षाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
समाजामध्ये जागृती करण्याचे काम आपल्या लेखणीद्वारे पत्रकार बांधव सातत्याने करीत असतात पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांचा एआयएमआयएम च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलतांना आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरून लोणार नगर परिषदच्या सर्व जागा लढवणार असल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष तौसिफ अली यांनी सांगितले. लोणार नगर परिषद पहिल्या पासूनच काँग्रेसचा गड राहिला आहे काँग्रेस तसेच शिवसेना पक्षाने आतापर्यंत बरेच वेळा नगर परिषदने आपल्या काबीज केली. तरी दोन्ही पक्षाकडून लोणारचा फारसा विकास झाला नाही तर फक्त स्वतःचे घर भरण्याचे काम केले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लावला. या निवडणूकित लोणारचा युवा वर्ग व जनता एमआयएम सोबत असल्याने पक्षाच्या बाजूने बरीच ताकत उभी आहे पक्षांकडे बरेच इच्छुक उमेदवार असून सोशल मीडियावर होत असलेले उमेदवारी दावे यावेळी त्यांनी उधळून लावले सध्या कोणतीच अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही प्रभाग आरक्षणानंतरच उमेदवाराची घोषणा स्वतः एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेश एम्तियाज जलील हेच करतील असे यावेळी ते म्हणाले
येणाऱ्या निवडणुकीत आमचा पक्ष सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर पाणीटंचाई, स्वच्छता,घरकुल, रस्ते या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे हेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत लवकरच लोणार येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष तौफिक अली, शहराध्यक्ष अमजद खान, जिल्हा सोशल मीडिया प्रभारी साहिल खान, युवा तालुका उपाध्यक्ष अश्पाक परसुवाले यांच्यासह सय्यद समीर, जावेद कुरैशी, शेख इक्बाल, शेख साहिल, शेख मुजफ्फर यांसारखे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
