[metaslider id=669]पावसाळ्यात पर्यटन नगरीला दोन महिने आड पाणी पुरवठा

लोणार, (न्युज महाराष्ट्र लाईव्ह/ यासीन शेख):
महावितरण कडून वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांची वीज जोडणी कापण्याची मोहीम राबविली जात आहे.आहे.याचा शिकार लोणार नगर परिषद झाली आहे. यांतर्गत महावितरणचे पथक आता मैदानात उतरले असून कुणाचीही गय न करता थेट वीज जोडणी कापली जात महावितरण कडून नगर परिषदचे बोरखेड़ी येथील धरणाची वीज जोडणी कापून टाकण्यात आली आहे.
परिणामी लोणार शहरातील पाणीपुरवठा वेळापत्र सद्या तरी आणखी सुरळीत होणार नाही असे दिसत आहे. बोरखेडी धरणाचे एकूण 817820 रुपयांचे वीज बिल थकले आहे. यामुळे महावितरणच्या पथकाने वीज जोडणी कापून टाकली आहे. या नियोजन शून्य कारभारामुळे भर पावसाळ्यात पण लोणार शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लोणार शहरात दोन दोन महिन्यांनी नळाला पाणी येत आहे नागरिकांना पावसात पण पाण्याच्या टँकरच आधार घ्यावा लागत आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे तरी मुख्याधिकारी तथा प्रशासक विभा वराडे यांनी नागरिकांना होणाऱ्या आर्थिक नुकसाना पासून लवकरात लवकर सुटका द्यावी व संबंधित अधिकारी वर्गाशी कानउघडणी करावी ही मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
*कार्यालयीन वेळेत तब्येती चे कारण सांगुन कमी वेळ कार्यालयात हजर राहणाऱ्या मुख्यधिकारी तथा प्रशासक यांच्या मनमानी कारभारामुळे नगरपरिषद ची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे*
