
मेहकर,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह)
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वर मेहकर जवळ मुंबईतील सराफा व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर लुटलं, मोठ्या प्रमाणात सोने व रोकड घेऊन चोरटे लंपास.
मुंबई येथील साराफा व्यापारी मेहकर हुन मुंबईकडे जात असताना मेहकर टोल प्लाझा नंतर ड्रायव्हरने फ्रेश होण्याचे कारण देऊन गाडी थांबवली व त्याचवेळी मागच्या बाजूने दुसऱ्या कारमधील चोरट्यांनी येऊन सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करत गाडीतील मोठ्या प्रमाणात सोने व रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
तात्काळ मेहकर पोलिसांना माहिती देण्यात आली असता मेहकर पोलिसांना अकोला जिल्ह्यातील पातुर जवळ लुटारूंची गाडी आढळली मात्र गाडीतून लुटारू पसार झाले आहेत.
सराफा व्यापाऱ्याला तात्काळ मेहकर येथील उपचारासाठी रुग्णालयात रेफर करण्यात आला आहे.
