
बुलढाणा, (न्युज महाराष्ट्र लाईव्ह) :
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 14 व 15 ऑगस्ट 2025 रोजी दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजती जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम, व नंतर महसुल भवन च्या भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.30 वाजता बर्दिया टाईल्स शोरुमच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वाजता सिंधू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी बुलढाणा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीनंतर शासकीय निवासस्थान बुलढाणा येथे राखीव, रात्री 7 वाजता अमदापुर ता.चिखली येथील डॉ.विशाल देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.
