
मलकापूर, (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) मलकापूर प्रतिनिधी, मागील दोन दिवसापूर्वी खामगाव वाडी येथील युवकाने मानेगाव येरळी लहान पुलावरून उडी मारून आत्महत्या केली मात्र त्यानंतर सादर तरुणाचे प्रेत दिसत नव्हते सतत दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर अखेर पूर्णा नजीपात्रात दिसून आले मंगेश प्रकाश कळस्कर वाडी खामगाव वय अंदाजे 26 वर्ष असे सदर युवकाचे नाव असल्याचे समजते गेल्या दोन दिवसापासून जळगाव जामोद महसूल विभाग पोलीस यंत्रणा ओम साई फाउंडेशन रेस्क्यू टीम ऑपरेशन राबवत अखेर 18 जुलै च्या दुपारी सदर युवकाचे प्रेत दिसून आले या शोध मोहिमेत ओम साई फाउंडेशन पथक अथक परिश्रम घेतले ओम साई फाउंडेशन चे अध्यक्ष विलास निबोळकर सुभाष पिवळतकर नितीन ठाकरे आश्विन फेरण कृष्णा वसोकार विष्णू धांडे राहुल निमकर्डे कपिल पाटील गणेश बोचे सतीश हिंगणकार आजीने दोन दिवसाच्या शोध मोहिमेत भाग घेऊन प्रेत शोधण्यासाठी प्रयत्न केले
