{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मोताळा : तालुक्यातील राजूर येथे ७नोव्हेंबर रोजी घरफोडीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील १० हजार रुपयांची नगदी रक्कम आणि सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. या मालमत्तेची एकूण किंमत अंदाजे ४०हजार रुपये आहे.
या प्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी शे. नफीज शे. इकबाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते १ नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह मलकापूर येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता परत आल्यानंतर
अस्ताव्यस्त घराचे कुलूप आणि कुंडी तुटलेली दिसली. घरात प्रवेश केल्यावर सामान आढळले आणि कपाटातील रोख रक्कम तसेच सोन्याची पोत आले. चोरीला गेल्याचे लक्षात आले,
बोराखेडी पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
