
कि. राजा (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह,प्रतिनिधी)
किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ताडशिवणी, हिवरखेड, पुर्णा, तडेगाव व किनगाव राजा परिसरातून अवैध वाळू उपसा करणारे टिप्पर जप्त केले. या कारवाईत साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई आज (दि.५) सप्टेंबर रोजी हिवरखेड पुर्णा रोडवर पहाटे करण्यात आली.
याबाबत असे की, आज पहाटे ३ वाजता किनगाव राजा हिवरखेड पुर्णा रोड येथे ठाणेदार संजय मारतोंडकर यांना
मिळालेल्या माहितीवरुन ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी हिवरखेड पुर्णा रोडवर पिवळ्या रंगाचा टिप्पर एमएच-२८-बीबी-६११२ थांबविले व तपासणी केली. यामध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू व पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी वापरलेली लाल रंगाची मारुती स्विफ्ट जप्त एमएच-२८-बीक्यू-६७४९ असा एकूण १०,५६,०००/-किंमतीचा मुद्देमाल केला. यामध्ये आरोपी समाधान नारायण मोरे व सचिन नामदेव राठोड रा. ताडशिवणी यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
