
लोणार,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख):-
बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. जाकीर हुसेन हायस्कूल लोणार च्या अंडर-14 बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रभावी खेळ सादर करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा आज लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल (LCPS) च्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
सेंट्रल पब्लिक स्कूल मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत महत्त्वाच्या सामन्यात डॉ. जाकीर हुसेन हायस्कूलच्या खेळाडूंनी LCPS संघावर विजय मिळवत आपले प्राविण्य सिद्ध केले. संघाने केलेली कामगिरी संघाच्या या उत्कृष्ट यशामागे श्रीकांत कवठेकर सर आणि नशरा मॅडम यांचे परिश्रमपूर्वक मार्गदर्शन व नियोजनबद्ध प्रशिक्षण यांचा मोठा वाटा राहिला.
खेळाडूनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने व प्रशिक्षकांनी केलेल्या अचूक मार्गदर्शनाने हे विजेतेपद संघाने पटकावले असल्याचे शाळेचे अध्यक्ष हाजी मसूद हे म्हणाले यावेळी शाळेचे अध्यक्ष हाजी मसूद,डायरेक्टर मोहम्मद फैसल आणि प्राचार्य डॉ. फिरोज खान यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संघाच्या विजयामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
