
लोणार,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख)
लोणार : लोणार येथील शेतकरी कैलास साहेबराव मापारी यांच्या शेतातील गोठ्यावर रात्री ११:३० वाजता गोठ्यात आला मोठ्ठा अजगर गोठ्यात कुट्यार ठेवलेल्या खोलीतून अचानक मांजराचा जोरात आवाज येत होता तो आवाज ऐकून गोठ्यावर झोपायला गेलेले आनंद कैलास मापारी खोलीत काय आहे हे बघण्यासाठी गेले असता त्यांना कुट्यारा मधे एक भला मोठा साप दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनचे सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना दूरध्वनी द्वारे कळविली ते दहा मिनिटातच गोठ्यावर पोहोचले व पाहणी केले असता लक्षात आले की हा अजगर जातीचा चार फूट लांबीचा बिनविषारी साप आहे. त्याला सुरक्षित पकडून पिशवीत बंद केले व सापाबद्दलची संपूर्ण माहिती दिली व यापुढेही असे कुठले साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना फोन करून माहिती देण्याची विनंती केली. यावेळेस शेतीचे मालक कैलास साहेबराव मापारी तसेच स्थानिक शंकर जनार्दन तनपुरे हे ही उपस्थित होते. अजगर हा वन्यजीव कायद्यानुसार शेड्युल वन मधील साप आहे अशा सापाला मारल्यास वन्यजीव कायद्यानुसार सात ते चौदा वर्षापर्यंत शिक्षा व पन्नास हजारापर्यंत दंड होऊ शकतो.दुसऱ्या दिवशी पहाटेच या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात मुक्त करण्यात आले. यावेळी वन्यजीव विभागाचे वनरक्षक पोळे साहेब, प्रादेशिक वनविभागाचे वनरक्षक कैलास चौधरी तसेच निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन ची पूर्ण टीम सर्पमित्र सचिन कापुरे,कमलेश आगरकर,उमेश चिपडे, विजय नरवाडे, ऋतिक सुसर, साखरे मॅडम, अविनाश, राधिका, रवी उपस्थित होते.
