
जामनेर (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह):-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामनेर तालुक्यातील बेटावद येथे भेट देऊन अलीकडेच हत्या झालेल्या सुलेमान खान यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
“सुलेमानच्या हत्येने संपूर्ण समाज व्यथित आहे. त्यांच्या आई-वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढेल,” असे आश्वासन सपकाळ यांनी यावेळी दिले.
या भेटीदरम्यान माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, तालुकाध्यक्ष शरद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सुलेमान खान हे मागील वर्षी गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या हत्येमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
“सुलेमानला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशी ठाम भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
