
बुलढाणा,१५ ऑगस्ट (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) :
सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सुविधा मिळाव्या या दृष्टिने जुन्या तहसील कार्यालय येथे नवीन महसूल भवन उभारण्यात येणार आहे. या महसूल भवन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोणशिलेचे अनावरण पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्याला विधानपरिषद आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, तहसिलदार विठ्ठल कुमरे, अँड नाझेर काझी व तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
