
लोणार:-(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/राहुल सरदार)
प्रवासी सेवा संघटना,लोणार यांच्या मागणीनुसार जागतिक वारसा असलेले पर्यटन स्थळ लोणार मार्गे चाळीसगांव आगाराची चाळीसगांव-माहुरगड हि नवीन फेरी दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासुन सुरू करण्यात आली आहे,हि फेरी चाळीसगांव येथुन सकाळी ०७:०० वाजता निघुन ती कन्नड,छ.संभाजीनगर,जालना,सिंदखेडराजा,सुलतानपुर,लोणार,रिसोड,वाशिम,पुसद मार्गे माहुरगड येथे सांयकाळी ०६:०० वाजता मुक्कामी पोहचेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता सदर फेरी परत निघुन ती चाळीसगांव येथे सांयकाळी ०६:०० वाजता पोहचेल,लोणार आणि रिसोड मार्गे सुरु करण्यात आलेली हि कन्नड,चाळीसगांव आणि माहुरगड करीता परिवहन महामंडळाची एकमेव फेरी आहे,लोणार बसस्थानक येथे शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष,नंदु भाऊ मापारी यांच्या हस्ते सदर फेरीचे चालक/वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,प्रवाशांच्या वारंवार होणाऱ्या मागणीची दखल घेऊन नितिन मैंद,महाव्यवस्थापक(वाहतुक)मुंबई,चेतन हसबनीस,उपमहाव्यवस्थापक(चालान)मुंबई,श्रीमती अनघा बारटक्के,प्रादेशिक व्यवस्थापक,छ.संभाजीनगर,सोनाली पाटील,प्रादेशिक कार्यालय,छ.संभाजीनगर,विजय गिते,विभाग नियंत्रक,जळगांव,दिलीप बंजारा,विभागीय वाहतुक अधिकारी,जळगांव,मयुर पाटील,आगार व्यवस्थापक,चाळीसगांव तर किशोर मगरे,वाहतुक निरिक्षक,चाळीसगांव यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी यामार्गाने ५ जिल्ह्यातुन धावणारी लांबपल्ल्याची हि एकमेव प्रतिष्ठित बसफेरी सुरू केल्याने प्रवासी,पर्यटक,विद्यार्थी आणि भक्तगण मध्ये आनंद व्यक्त केले जात आहे,तसेच सदर बसफेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदु भाऊ मापारी,आणि प्रवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष,उस्मान शेख,सचिव,भागवत खरात,आणि उपाध्यक्ष,अशोक काटकर यांनी केले आहे तसेच राज्य परिवहन महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहे.
