
लोणार • न्युज महाराष्ट्र लाईव्ह (यासीन शेख)
उन्हाळा सुरु झाला असतांना एकीकडे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आणि अशा गर्मीच्या दिवसात लोणार शहरातील साबुनपुरा परिसरात राहणाऱ्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मोहम्मद ज़ोहान शेख फहीम यांनी आपल्या जीवनातील पहिला (उपवास) रोजा पुर्ण केला आहे. इस्लाम धर्मात रमजान महिन्याला विशेष महत्त्व आहे.
या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेच्या ‘सहरी’ पासून ते सूर्यास्त पर्यंत नंतरच्या ‘इफ्तार’ पर्यंत उपवास (रोजा) करतात. संयम, शिस्त, प्रार्थना आणि इतरांप्रती सहानुभूती यांचा संदेश देणारा हा महिना मानला जातो.सध्या सहेरी पासून इफ्तार पर्यंत 12 तास 56 मिनिटाचा उपवास असून वयाच्या पाचव्या वर्षी उपवास केल्याने एवढ्या लहान वयात रोजा पाळण्याचा त्यांचा निर्धार पाहून परिसरातील शहरातील नागरिकांकडून मोहम्मद ज़ोहान याचा कौतुक होत आहे. यावेळी त्याचे आजोबा हाजी शेख वाहेद,वडील शेख फहीम,काका शेख रहीम,शेख जुबेर यांच्या कडून हार टाकून त्याचे कौतुक करण्यात आला.
