
लोणार • न्युज महाराष्ट्र लाईव्ह (यासीन शेख)
तहसील कार्यालया समोरील नारायण रमेश आढाव राहणार लोणार यांच्या दुकानात आढळला अजगर साप आढाव यांचे दुकान मागील दोन महिन्यांपासून बंद होते. दुकानातील साफ सफाई करण्यासाठी त्यांचे वडील रमेश आढाव सकाळी 11 वाजता पोहचले दुकानात ठेवलेली काही रिकामी पोती उचलत असतांना त्यांना अचानक त्या पोत्यांखाली एक जाडजूड साप दिसून आला त्यांनी निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन चे सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना याची सूचना दिली.तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता लक्षात आले की हा अजगर जातीचा बिनविषारी साप आहे, इंग्लिश मधे याला Indian Rock Python म्हणतात. साधारण दीड वर्ष वयाचे आणि तीन फूट लांबीचे पिल्लू होते.शासनाच्या 1972 च्या वन्यजीव कायद्यानुसार अजगर साप हा शेड्युल वन मध्ये येतो, याला मारणे पाळणे हा गंभीर गुन्हा आहे. या सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र कमलेश आगरकर व सचिन कापुरे उपस्थित होते.
या सापाची सरासरी लांबी 10 फुटापर्यंत वाढते राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धब्बे असतात पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर असतो शरीर अतिशय स्थूल असते व शरीरावरील खवले मऊ असतात, तोंडावर गुलाबी रंगाची छटा असते, याच्या प्रमुख खाद्यामध्ये उंदीर, घुस, ससे अशा छोट्या प्राण्यांपासून माकड, कुत्रा, कोल्हा, हरिण असे मध्यम आकाराचे प्राणी येतात.
