
लोणार, न्युज महाराष्ट्र लाईव्ह- यासीन शेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या नेतृत्वात आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी लोणार येथे बस स्टॅन्ड समोर शेकडो युवकांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रीय बेरोजगार दिवस वडे भजे तळो आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांनी बोलतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांची फसवणूक केली आहे बेरोजगारांना कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही देशातील अनेक युवक नोकऱ्यापासून वंचित आहे अनेकांजवळ डिप्लोमा,डिग्री असून सुद्धा त्यांना हॉटेलवर, दुकानावर, मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जावे लागत आहे.असे म्हणाले यापेक्षा मोठी दुर्दैव नाही यावेळी नोकरी चोर गद्दी छोड, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदवीधरांचे गाऊन परिधान करून “MBA वडा पाव वाला”, “इंजिनिअर चायवाला” अशी फलकं घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने वडापाव आणि चहा विक्री करून देशातील बेरोजगारीचा तीव्र प्रश्न अधोरेखित केला. पुढे बोलताना अनिकेत मापारी यांनी सांगितले की, मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात देशातील युवक बेरोजगारीच्या दलदलीत अडकले आहेत. शिक्षण घेऊनही लाखो तरुणांना रोजगार मिळत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळेच युवक काँग्रेसतर्फे आजच्या दिवशी पंतप्रधानांना “विशेष शुभेच्छा” देत निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला सोशल मीडियावर देखील राष्ट्रीय बेरोजगार दिवस आणि NationalUnemploymentDay हे हॅशटॅग ट्रेंड होत असून देशभरातील युवक आपला संताप व्यक्त करत आहेत.
यावेळी युवक काँग्रेसचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विभागीय अध्यक्ष भरत राठोड, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे, यांनी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, माजी नगरसेवक संतोष मापारी,माजी नगरसेवक शेख रुउफ शेख महेबूब माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम, शुभम चाटे,एजाज खान ओम पाटोळे,गौरव धुमाळ गोपाल आखाडे शेख अजमत शेख अनामत, रहमान नोरंगाबादी आदी उपस्थित होते.
