
बुलडाणा, न्युज महाराष्ट्र लाईव्ह प्रतिनिधी :-
शेतजमीनीचा वर्ग २ मधून वर्ग १ बदलण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतांना मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना अकोला विभागाच्या (एसीबी) पथकाने १४ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले. बुलढाणा शहरातील लक्ष्मीनगर स्थिती पाटील यांच्या यांच्या राहत्या घरी ही कारवाई झाली, पैसे घेतल्यानंतर शंका आल्याने मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी स्वीकारलेले पैसे शौचालयात फेकले होते
तक्रारदारांनी तक्रारी मध्ये नमूद केले आहे की तक्रारदाराच्या मामाकडील थड येथील गट क्रमांक २३ मधील १.६२ हे.आर. शेतजमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठी तहसिलदार पाटील यांनी प्रति एकर ५० हजार रुपये अशी एकूण ४ एकरासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी ३ सप्टेंबर रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
पडताळणीदरम्यानही मोताळा तहसिलदार हेमंत पाटील यांनी लाच मागितल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. त्यानंतर रविवारी दुपारी एसीबीने रचलेल्या सापळा कारवाईत त्यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारली.
त्यानंतर आरोपीस संशय आल्याने आरोपीने सदरची लाच रक्कम त्याचे राहते घराच्या शौचालयामध्ये टाकून दिले व लाच रक्कम (पुरावा) नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदरची लाच रक्कम रू. २,००,०००/- दोन्ही पंचासमक्ष जप्त करण्यात आली. त्यावरून नमुद आरोपी विरूध्द पोलीस
स्टेशन बुलढाणा (शहर) जि. बुलढाणा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती मा. श्री. मारुती जगताप, मा. श्री. सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक,अमरावती श्री. मिलिंदकुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि. अकोला यांचे मार्गदर्शनात सापळा अधिकारी श्री. अतुल इंगोले, पोलीस अंमलदार दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदिप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार, मपोहवा. अर्चना घोडेस्वार, चालक नफिस ला.प्र.वि. अकोला यांनी केली
