
पिंपळगाव राजा(न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी)
“सकाळी सात वाजता मिरवणूक अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या शमशेरपूर घरापासून सुरू झाली. दुसरी मिरवणूक रेहान पार्क येथून सय्यद नदीम यांच्या घरून निघाली आणि पुढे दोन्ही मिरवणुका एकत्र आल्या.”
“या सोहळ्यात सहीद हाफिझ साहेब, राजा कमिटीचे सचिव मुझ्जू जमदार, मुस्ताक टेलर, शेख जाकीर, तोफिक ठेकेदार, शेख शोएब, युसुफ भाई यांचा सहभाग होता. शहरातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले.”
“एकता कॉम्प्लेक्स येथे मोईनभाई आणि आसिफभाई यांनी लस्सी पाजली, अकीलभाई मेडिकल यांनी मुलांना बिस्किटे दिली. अंदाज हॉटेल येथे युनुसभाई, नावेदभाई, युसुफभाई यांनी शरबताची व्यवस्था केली, तर आवेशभाई मौसम टाकत होते. पेटपूरा येथे इक्बालभाई बेकरीवाले व स्थानिक नागरिकांनी मिठाई व पाणी वाटले.”
कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (IPS), ठाणेदार मुकेश गुजर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी शिस्त व सुरक्षा सुनिश्चित केली. अध्यक्ष हसन इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले आणि पोलिस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.”
पीपळगाव राजा शहरातील हा ऐतिहासिक सोहळा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक ऐक्य आणि भाईचाऱ्याचे प्रतीक ठरला आहे.
