
खामगाव (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) :
फोन आल्यानंतर बाहेर गेल्याची संधी साधत एका शेतकऱ्याची रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ३० ऑगस्ट रोजी घडली. या पिशवीत शेतकऱ्याचे एक लाख २७ हजार रुपये होते. या प्रकरणी पोलिसात तक्रारदाखल करण्यात आली आहे.
खामगाव शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शिवदास सुखदेव घ्यार (५१, रा. किन्ही महादेव, ता. खामगाव) हे पैसे काढण्यासाठी आले होते. एकाने त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली पिशवी सुपुर्द केली. त्यांनी ती पिशवी बँकेच्या काउंटरवर ठेवली होती. दरम्यान, फोन आल्याने ते बाहेर गेले असता, अंदाजे २० ते २१ वयोगटातील अज्ञात युवकाने पिशवी चोरून नेली. ही घटना सायंकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंतच्या दरम्यान घडली. सोमवारी सायंकाळी खामगावशहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.
