
बुलढाणा(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान)
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारी धाड ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार मागील काही वर्षा पासून होत असल्याच्या आरोप अन्याय भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य संघटनाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे की धाड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अनागोंदी कारभारा तसेच ग्रामस्वराज वेबसाईटवरून ग्रामपंचायतीच्या खर्चाची अधिकृत बिले तपासणी आणि लेखापरीक्षण विभागामार्फत प्राप्त कागदपत्रे अभ्यासली असता अनेक गंभीर अनियमत्ता उघडकीस आल्या आहेत, विशेष म्हणजे कामे प्रत्यक्षात झाली नसतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून बोगस बिले तयार करून सरकारच्या तिजोरीतला जनतेच्या पैशाच्या सचिव ग्रामपंचायत धाड यांनी संगत मत करूनअपहार केलेला आहे तसेच धाड गावातील गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असल्याने निवेदनकर्ते जाकीर मिर्झा यांनी चौकशीची मागणी सुद्धा या पत्राद्वारे केलेली होती परंतु या गंभीर प्रकरणाची वेळेवर तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 पंचायत समिती कार्यालय बुलढाणा समोर आमरण उपोषण सुरू केला आहे,
दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ग्रामपंचायचे संबंधित दोषी अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच बोगस कामावर झालेले सर्व खर्च वसूल करण्यात यावा व माहिती अधिकार अंतर्गत चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी या आंदोलनात होत आहे.
