
बुलढाणा (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून पर राज्यातील वाहन चालकाकडून जबरदस्तीने पैसे उकडल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणातील पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना एका आदेशान्वये निलंबित केल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकस खळबळ उळालेली आहे
कर्नाटक राज्यातील चलकेरे जिल्हा चित्रदुर्ग येथील ताज अब्दुल रहमान वय २३वर्ष आकिब शेख इब्राहिम आणि जुबेर अहमद या सहकार्यासह एका कारने ५ ऑगस्ट रोजी मलकापूरकडे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्याकरीता येत होते बुलढाणा बायपास रोडवर ट्राफिक पोलिसांनी त्यांच्या वाहनाची अडवणूक करून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पेटीएमद्वारे १५०० रुपये घेतले. त्यानंतर इतर तीन पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या एअर रायफलवर कारवाई न करण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. या घडामोडींमुळे तक्रारदाराचे वाहन अनियंत्रित होऊन अपघात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पो.हवा/११९८ गजानन भंडारी – वाहतूक नियंत्रण शाखा, बुलढाणा, पोकॉ./२५४४अभय टेकाळे पो.स्टे. चिखली, पो.हवा./८१९ विठ्ठल काळुस महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर,पोका./३०६ विजय आंधळे – महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. तसेच पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश ७ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे. तसेच निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
