
मलकापूर :(न्युज महाराष्ट्र लाईव्ह)
खामगाव एमआयडीसीच्या परिसरातून 2 ऑगस्टरोजी सकाळी आठ वाजता बेपत्ता झालेल्या 48 वर्षीय घनश्याम रमेशचंद्र भुतडा यांचा मृतदेह अखेर पाच ऑगस्ट रोजी विटाळी धानोरा शेतशिवाराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगतच्या एका शेतातील विहिरीत आज सकाळी घनश्याम यांचा मृतदेह आढळून आला. या इसमाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतमजुरांना ही घटना दिसून आली. त्यांनी तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. यासोबतच फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर या ठिकाणी पाठवण्यात आले, घटनेमागचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
