
बुलढाणा,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. पात्र जेष्ठ साहित्यीक व कलावंतांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र लाभार्थ्यांनी https://mahakalasanman.org/pgeApplicationFromForUser.aspx लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच आपले सरकार पोर्टलवरूनही अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची दोन प्रिंटआउट प्रती संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत व मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य पुरावे जोडावेत.
