
बुलडाणा: (न्युज महाराष्ट्र लाईव्ह)आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी बुलढाणा ग्रामीण च्या वतीने संघटनात्मक पूर्व तयारीचा आढावा घेण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने आज बुलढाणा येथे भारतीय जनता पार्टी बुलढाणा ग्रामीण मंडळाची संघटनात्मक बैठक पार पडली.
सुरुवातीला लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला व आवश्यक त्या सूचना करून कार्यकर्त्यांना निवडणूकांमध्ये लोकसभा विधानसभा प्रमाणेच महाविजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करण्याचे आवाहन करण्यात आले.
येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याकारणाने सर्वांना झोकून देऊन काम करावे लागेल. आपण एका राष्ट्रीय पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यामुळे जनता नक्कीच आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे आता जनतेच्या साथीने पुन्हा एकदा आगामी निवडणूकांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून जनसेवेसाठी सज्ज व्हावे लागेल त्यासाठी दिवस रात्र एक करून आपल्या पक्षाला विजयी करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सतिश भाकरे पाटील यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतांना केले.
यावेळी या बैठकीला बुलढाणा ग्रामीण मधील विविध भागातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये सर्वांनी संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे ठरविले तसेच येणाऱ्या काळात पक्षाला चांगले यश मिळवण्यासाठी सगळ्यांनी संघटित होऊन पक्ष वाढवण्यासाठी काम करण्याचे ठरले.
शेवटी भाजपा नेते तथा माजी मंत्री आ.संजूभाऊ कुटे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर मासिक सभेच्या कामकाजामध्ये तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील, भाजपा नेते सुनील देशमुख, डॉ.राजेश्वर उबरहंडे, तालुका समन्वयक दशरथसिंग राजपूत, गणेश देहाडराय, वसंतराव सोनुने, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रीतीताई खंडारे, सरचिटणीस सतीश देहाडराय, राजेंद्र चिकटे, तालुका उपाध्यक्ष कुलदीप पवार, सारंगधर एकडे, गणेश जेऊघाले, तालुका सचिव मोहन निमरोठ, सुधाकर वानेरे, समाधान जाधव, बूथ प्रमुख रवींद्र जाधव, विलास खार्डे, प्रदीप तोटे, विजय भोसले, प्रकाश पवार, कैलास सोनुने, सागर पाटील यांच्यासह इतर प्रमुख भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
