रमीमास्टर विधानभवनात रमी खेळताना चे दृश्य पाहून तीव्र भाषेत निषेध

मलकापूर (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नव्याने मंजुर केलेल्या जन सुरक्षा कायदा पारित केलेला असुन लागु करण्याचा निर्णय घेतलेला आहे जन सुरक्षा कायदा हा सुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनधिकृत निर्बंध घालणारा असल्यामुळे हा कायदा रद्द होणे अत्यंत गरजेचे आहे कारण जन सामान्य व्यक्ती किंवा राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत व कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठविला तर सदरचे कृत्य हे राष्ट्रहिता विरोधी कृत्य ठरवून यावर अनधिकृत रित्या कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकार व जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून स्वतःकडे राखुन ठेवत आहे त्यामुळे सरकार या कायद्यामुळे जनसामान्यांची व लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कटदाबी करीत आहे सत्ताधाऱ्यांचे चुकीचे धोरणाचे सत्य जगासमोर आणण्यापासुन सर्वसामान्य जनतेला रोखण्याचे हे राज्य सरकारचे मनमानी धोरण मान्य नाही तसेच या कायद्याला राज्यातील विविध सामाजिक संघटनांनी विरोधी पक्षातील विविध राजकीय पक्षांनी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शविला आहे सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा अशा मागणीसह जन सुरक्षा विधेयक पारित केलेल्या प्रतींची होळी करण्यात आली व सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुळ हक्क त्यांना प्रदान करावा तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सभागृहांमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या विषयाकडे लक्ष न देता ऑनलाइन रमी या पत्त्याचे गेम खेळताना चा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला असुन एकीकडे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे विविध समस्यांना तोंड देत असताना या शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा निर्णय न घेता राज्याच्या महत्त्वपूर्ण सभागृहांमध्ये ऑनलाइन रमी गेम खेळत असलेल्या या कृषिमंत्र्याला तात्काळ निलंबित करून राजीनामा मागावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या बाबत योग्य न्याय दिल्याची भूमिका शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारचे निवेदन मलकापुर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मलकापुर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय राज्यपाल महोदय यांना देण्यात आले आहे याप्रसंगी डॉ. अरविंद कोलते, हाजी रशीद खान जमादार , एडवोकेट हरीश रावळ , सौ. मंगलाताई पाटील, राजेंद्र वाडेकर, सोपानराव शेलकर , प्रमोद दादा अवसरमोल , संभाजी शिर्के, आताऊर रहेमान जमादार , राजु पाटील, युसुफखा उस्मान खान , डॉ. सलीम कुरेशी , एडवोकेट जावेद कुरेशी, सुहास चवरे , घनश्याम भाऊ पुरोहित, अनिल गांधी , रोहन देशमुख , अनिल बगाडे, प्रवीण पाटील , जाकीर मेमन, किसनराव पाटील , हाजी उस्मान मास्टर, वाजिद खान पत्रकार , गिरीश देशमुख , साजिद खान , विजु बाप्पा निर्मल, विनय काळे , ज्ञानदेव तायडे , अजमत जमादार , गजेंद्र सोनवणे , शेख करीम शेख गफार, असगर जमादार , इकबाल खान, एजाज शहा, रवींद्र पाटील , प्रशांत नाफडे ,सलीम एम एस , आसिफ खान दाऊद खान, रऊफ सेठ केले वाले, अयुब शहा , सादिक शेख , राजु ऊखर्डे , राजेंद्र वानखेडे ,शेरखान, अशोक मराठे , नानाराव वाघ , विलास खर्चे , अशोक मराठे , अश्रप पेंटर, जावेद ठेकेदार, कैलास ताटे , आयुब ठेकेदार अशोक जाजू सलीम बम्बैया , शकील पठाण, अनिल मुंधोकार , फिरोज खान , गोपाल तांदुळे यांच्यासह नागरिक व काँग्रेसचे , नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी रईसखान जमादार व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल भारंबे यांनी केले होते.
