

न्यूज महाराष्ट्र लाईव्ह / प्रतिनिधी,
बुलढाणा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे देऊळघाट येथे दि. १९ फेब्रुवारी, २०२६ रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम गावातील विठ्ठल-रुखमाई मंदीरात शिवरायांच्या पुतळयाला गावकरी/वारकरी यांचे वतीने दुग्धाभिषेक करण्यात येऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर येथून शिवरायांच्या प्रतिमेची शिवभक्तांनी गावातील क्रांती चौक, माळी मोहल्ला, देशमुख मडी,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया पासून, धनगर मोहल्ला, इकबाल चौक, बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरुन विठ्ठल-रुखमाई मंदीर परिसरात आरती घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांनी महाराज व गावकरी यांनी अभिवादन केले. त्याच प्रमाणे गावातील प्रतिष्ठित महिला व नागरीक तसेच शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या प्रसंगी पोलीस निरिक्षक गजानन कांबळे यांचेसह पोलीस उपनिरिक्षक शरद माळी, देऊळघाट बिट जमादार गजानन तायडे, सुधिर मगर, गावचे पोलीस पाटील तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेऊन शिवरायांची मिरवणूक सर्व धर्मिय नागरीकांनी उत्साहात व शांततेत पार पाडावी असे आवाहन यावेळी पोलीस निरिक्षक गजानन कांबळे यांनी उपस्थित नागरीक तसेच शिवप्रेमी यांना केले. जयंती मिरवणूकीच्या वेळी गावातील तसेच परगावातील वारकऱ्यांनी टाळ व मृदंग या वाद्यामध्ये शिवरायांना अभिवादनपर भजन व गिते गायीली.
सदर कार्यक्रमाचे आयोजक नंदू लवंगे (समिती अध्यक्ष), अक्षय बंडू पाटील (समिती उपाध्यक्ष), सुभाष पुरी (समिती सचिव), यांनी या कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी गावकरी व शिवभक्तांसह सामाजिक व राजकीय नेत्यांनी पार पाडले.
