बुलढाणा ते अजिंठा रोडची घटना!

बुलढाणा• न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
बुलढाणा येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टीनंतर देऊळघाट कडे भरधाव वेगात नेणाऱ्या इको वैनने समोर चालणारी दुचाकी बुलेट ला जोरदार धडक दिली यात दोन्ही वाहन रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन भिडल्या आणि यात 38 वर्ष तरुणाच्या दुर्दैवी जागीच मृत्यू झाला असून जखमी चार विद्यार्थ्यांवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे
स्कूल व्हॅन चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की देऊळघाट येथील रहिवाशी गोविंदा पसरटे याच्याकडे मारोती इकोव्हन असून त्यात तो देऊळघाट येथील विद्यार्थ्यांना दररोज बुलढाणा येथील शाळेत ने – आण करतो,
दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गोविंदा पसरटे शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन देऊळघाट कडे निघाला होता त्यावेळी समोर चालणारी दुचाकी बुलेट ला त्यांनी हॉटेल निवांत जवळ मागून जोरदार धडक दिली त्यात दोन्ही वाहने शेतात जाऊन पलटी झाले यात दुचाकी बुलेट वरील शेख तोसिफ शेख युसुफ वय 38 वर्ष राहणार शेंदुर्णी जिल्हा जळगाव तसेच रियाज बेग जफर बेग वय 38 वर्ष राहणार देऊळघाट हे दोघे गंभीर जखमी झाले तसेच व्हॅन मधील काही विद्यार्थी देखील जखमी होते तात्काळ सर्व जखमींना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी शेख तोसिफ शेख युसुफ याला मृत घोषित केले तर जखमी रियाज बेग जफर बेग याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सध्या जखमी विद्यार्थी यांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता तर काही लोकांनी दारुड्या स्कूल वैन चालकाला चाप देखील दिला होता.
माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार रवि राठोड घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चालकाला ताब्यात घेतले पुढील कारवाई पोलीस करीत आहे.
