
न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/ प्रतिनिधि,सय्यद जुनेद
बुलढाणा:- रायपूर गावातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजुर झाले आहे परंतु काही लाभार्थ्यांना केवळ एक किंवा दोनच हप्ते मिळालेले आहे त्यामुळे पैसे नसल्याकारणाने लाभार्थ्यांनी घर बांधकाम थांबलेले आहे.
तसेच घर बांधकाम करण्याकरीता काही घरकुल लाभार्थ्यांना तात्पुरत्या निवासाकरीता दुसऱ्याचे घर भाड्याने घेतलेले आहे. त्यामुळे त्या घराचे भाडे सुध्दा भरावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थीक विवंचणेत सापडलो आहोत. म्हणून मा. साहेबांनी त्वरीत लक्ष घालून थकीत हप्ते वितरीत करावे, अशी मागणी होत आहे जेणे करुन राहीलेले बांधकाम पूर्ण करुन हक्काच्या घरामध्ये रहायला जाता येईल.
जर येणाऱ्या पुढील सात दिवसांत उर्वरीत हप्त्याची रक्कम नाही मिळाली तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही .सदर आंदोलनामध्ये बिऱ्हाड सर्व कुंटुंबासहीत हे रस्त्यावरच आणून राहणे सुरु करणार आहोत. व यामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा सुद्धा या पत्रामध्ये शमीम सौदागर, निलेश राजपूत व सर्व गावकरी लाभार्थ्यांनी दिला आहे.
